मुंबई : विक्रोळी पश्चिम मधील ब्लू मेन सोसायटीतील नवरात्र उत्सवाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा उत्सव पूर्णतः पर्यावरणस्नेही असून या उत्सवात प्लास्टिकचा वापर करण्यात येत नाही. नवरात्रोत्सव,सणाचा हेतू कायम ठेवत सोसायटीमधील मंडपात प्लॅस्टर ऑफ पॅरिस मातीची भव्य देवीची मूर्ती टाळून येथे महालक्ष्मी देवीची प्रतिमा मंचावर बसवली आहे. या देवीच्या प्रतिमेसमोर येथे गरबा, दांडिया, भजन, जागरण गोंधळ असे वेगवेगळे कार्यक्रम येथे रोज होत आहेत.या कार्यक्रमाच्या प्रसंगी नंदकुमार आंबोकर, अविनाश गरिबी, चेंम्बोथ गोपीनाथन, राजेश शिर्के, सुहास लांडे, कल्पेश राऊत यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
