ठाणे : मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे १२ आणि १४ वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. हि निवड चाचणी सेंट्रल मैदानातील इनडोअर अकादमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होईल. या निवड चाचणीत सकाळी ९.३० वाजता १२ वर्षांखालील मूलांची (१जानेवारी २०१३ व त्यानंतर जन्म झालेली मूले) निवड चाचणी होईल.१४ वर्षांखालील मूले (१सप्टेंबर २०१० नंतर आणि १सप्टेंबर २०१३ पूर्वी जन्म झालेली) पात्र ठरतील. निवड झालेल्या खेळाडूंना मुबई क्रिकेट संघटनेच्या अधिकृत स्पर्धामध्ये क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. इच्छुक खेळाडूंनी आपापल्या जन्मदाखल्यांसह संपूर्ण पांढऱ्या गणवेशात किटसह वरील दिवशी आपापल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहावे. इनडोअर अकादमी मध्ये निवड चाचणी होणार असल्यामुळे स्पाईक्स शूज वापरता येणार नाहीत..अधिक माहिती साठी क्लबचे प्रशिक्षक राज जाधव (९८२१०९५५७७) किंवा सचिन गोरिवले (९०२२२२१२३४) यांच्याशी संपर्क साधावा.
