कमलाबाई कडवे कॅरम स्पर्धा

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती आंतर शालेय-कॉलेज मुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, सृष्टी चावंडे, संस्कृती निकाळजे, सारा देवन, अदिती चव्हाण आदींनी सलामीचे सामने जिंकले. स्वरा कदमने प्रारंभापासून अचूक खेळ करीत नाझीश खानचे आव्हान २५-० अशा नील गेमने संपुष्टात आणले. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, दत्ता पाटील, काशिनाथ माटल, मारुती शिंत्रे, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

परेल येथील आरएमएमएस सभागृहात मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आदी जिल्ह्यातील ६० मुलींनी स्पर्धेत भाग घेतला.  आर. बी. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या सृष्टी चावंडेने पहिला बोर्ड ७-० असा घेत प्रतिस्पर्धी तिरुमला काथूरोजीगिरीवर दबाव निर्माण केला. सृष्टीने आघाडीचे सातत्य राखत सलामीचा सामना १६-० असा जिंकला. अन्य सामन्यात नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरच्या संस्कृती निकाळजेने सेस मायकल हायस्कूलच्या फातिमा शेखवर ९-० असा, पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या सारा देवनने पूर्वी सिंगवर १७-६ असा, रोझरी हायस्कूल-डॉकयार्डच्या अदिती चव्हाणने अनन्या अरविंदवर १३-५ असा विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पंचाचे कामकाज चंद्रकांत करंगुटकर, अविनाश मोहिते, वेदांत महाडिक, विक्रांत धिवर आदी करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *