शिवसेना वडाळा विधानसभा आणि आयोजक शिवसेना महाराष्ट्र विस्तारक निलेश बडदे यांनी आयोजित केलेल्या घरगुती गणेश मकर सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच दादर येथे जल्लोषात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन आहिर, विभागप्रमुख महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव,नगरसेविका उर्मिला पांचाळ, आणि इतर मान्यवर मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
