मुंबई मराठी पत्रकार संघात
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अवयवदान आणि देहदान’ या विषयावर येत्या १९ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या कालावधीत एका राज्यस्तरीय कार्यशाळेचे करण्यात आले आहे.
समाजात ‘अवयवदान आणि देहदान’ याबाबत जनजागृती वाढत आहे. प्रत्यक्षात या श्रेष्ठतम दानाचे प्रमाण वाढू लागले आहे. यासंदर्भात विविध प्रसार माध्यमातून बातम्या किंवा लेख प्रसिद्ध होत असतात. परंतु यापैकी अनेक बातम्या किंवा लेखांमध्ये या विषयाची मांडणी अयोग्य पध्दतीने होत असल्याचे अनेकदा आढळून येते. परिणामी समाजामध्ये ‘अवयवदान आणि देहदान’ या संदर्भात चुकीची माहिती प्रसारीत होण्याचा धोका उद्भवतो. मात्र या विषयासंदर्भात पत्रकारांना प्रारंभिक माहिती योग्य प्रकारे दिली गेल्यास अनेक गैरसमज मुळातच टाळून हा धोका टाळता येईल. त्याकरीता कार्यशाळा आयोजित करण्याची आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन मुंबई मराठी पत्रकार संघ आणि दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन प्रशिक्षणाचा हा उपक्रम हाती घेतला आहे.
या कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि त्याकरीता इच्छुकांनी खालील गुगल फॉर्म लिंकवर आपला तपशील भरून द्यावा,असे आव्हान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचेही मुख्य समन्वयक कुमार कदम यांनी केले आहे.
