नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा.आयुक्त साहेब डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालया अंतर्गत करावे गांव नवी मुंबई येथील 1) संताजी नाईक घर नं. 873, सेक्टर-36, करावे गांव, 2) प्रतिक संताजी नाईक, घर क्र.996 से.36 तसेच 3) श्री. लहू काशिनाथ सांगडे, घर क्र.-233, से-36, करावे गांव यांनी नवी मुंबई येथे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
सदर अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
अे-विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन 1) संताजी नाईक घर नं. 873, सेक्टर-36, करावे गांव यांचे अनधिकृत बांधकाम, 2) प्रतिक संताजी नाईक, घर क्र.996 से.36 करावे गांव यांचे अनधिकृत बांधकाम दि.10.10.2024 रोजी निष्कासित करण्यात आले आहे. तसेच 3) श्री. लहू काशिनाथ सांगडे, घर क्र.-233, से-36, करावे नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम दि. 30.08.2024 रोजी निष्कासित करण्यात आले होते. तदनंतर संबंधितांनी पुनश्च: बांधकाम सुरु असल्याचे निर्दशनास आल्याने श्री. प्रबोधन मवाडे, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी – बेलापूर, यांचे नियंत्रणाखाली या धडक मोहिमेसाठी श्री. मयुरेश पवार, कनिष्ठ अभियंता व विभागातील इतर अधिकारी/ कर्मचारी यांचे समवेत कारवाई करणेत आली. सदर मोहिमेसाठी मजूर 10, हॅमर – 02, गॅसकटर- 01 इत्यादी साधनसामुग्री तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
