कृष्णा पाटलांनी थेट रुग्णालय आमच्या दारात आणले
आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गंभीर आजारावर मोफत उपचार
ठाणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष आणि भाजप नेते कृष्णा पाटील यांनी गोकूळनगर येथे आपल्या मतदार संघात दोन दिवसीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात विविध गंभीर आजार असलेल्या वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले तसेच नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत उपचार, औषधे मिळाले. मोठ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो मात्र या आरोग्य शिबिरात आपल्या घराजवळ दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले आणि नागरिकांनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी माजी नगरसेवक कृष्णा पाटील, नंदा पाटील यांचे कौतुक केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी राज्यात 25 हजार आरोग्य शिबीर घेण्याचे संकल्प केले होते त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेते माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आपल्या प्रभागात मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालय, कौशल्या रुग्णालय, महावीर जैन रुग्णालय असे सर्व मिळून 50 डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांच्या समूहाने या शिबिरात सहभाग घेतला होता. 8 आणि 9 ऑक्टोबर या दोन दिवशी आरोग्य शिबिरात हृदय विकार, किडनीचे आजार, लिव्हर, डोळ्यांचे आजार, थायरॉईड, कान, नाक, घसा यांचे आजार, बीपी, मधुमेह, कॅन्सर, मान, गुडगा, कंबरदुखी अशा विविध 30 आजारांवर मोफत उपचार तसेच मोफत औषध यावेळी नागरिकांना शिबिरात देण्यात आले तसेच गरजू लोकांना मोफत ऑपरेशनसाठी पुढे पाठविण्यात आले.
मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी मोठा खर्च होतो मात्र राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे आपल्या प्रभागातच दर्जेदार तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळाल्यामुळे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. या शिबिरात वैद्यकीय मदत कक्षाचे सदस्य सदस्य डॉ राहुल कुलकर्णी, कविराज चव्हाण, ठाणे भाजप आरोग्य आघाडीचे डॉ अपर्णा तांजने, गोकुळनगर प्रभागातील महिला, पुरुष कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला.
