मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने १४ आणि १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्य पंच उजळणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. दैवज्ञ भवन, कबाडे हॉस्पिटल, आकाशवाणी समोर, कोल्हापूर रोड, सांगली येथे हे दोन दिवसांचे शिबिर होईल. या शिबिरात नियमातील उजळणी बरोबरच पंचांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन व एकाग्रता यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन सोमवारी १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता करण्यात येईल. या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व संलग्न जिल्हा संघटनेच्या पंचानी रविवारी सायंकाळी ७ नंतर शिबिरास्थळी उपस्थित रहावे असे राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे. अधिक माहितीकरिता सांगली जिल्हा संघटनेचे सचिव नितीन शिंदे – 9922508833, किंवा अनिल माने – 9860053587 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
00000