मुंबई, : – मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मध्य-मुंबई जिल्हाध्यक्ष समाजरत्न डॉ. सिद्धार्थदादा टी.कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला, यावेळी चांदिवली राष्ट्रवादी परिवाराचे प्रशांत बारामती (जिल्हाप्रमुख सामाजिक विभाग), अस्लम शेख जिल्हा सचिव, संतोष गवळी (162 प्रभाग अध्यक्ष) डॉ. ) सचिन वाकोडे (तालुका अध्यक्ष सामाजिक), आलोक राय युवक समाजसेवक आणि आनंद मार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम च्या दीदी सहित मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
00000
