स्वाती घोसाळकर
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारी दिलाय. निवडणूकीत कोणाशीही आघाडी नाही आणि युती करणार नसून येणारी विधानसभा स्वबाळवर लढविणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज जाहिर केले. राज्यातील भ्रष्ट्राचारि, बोकाळलेली महागाई आणि बेरोजगारीविरोधात आजपासून आपण एल्गार पुकारत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहिर केले.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी घोषणा केली आहे. विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती – आघाडी नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडुकीसाठी ना यु्त्या , ना आघाड्या… आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू… जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने आमच्या हातात द्यावी
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. सत्तेतील आणि विरोधातील लोक निवडणुकीसाठी काहीही करतील. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या कारण तुमचे पैसे आहेत आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
रतन टाटासारखा सरळ सभ्य माणूस सर्वांना आवडतो तर राजकारणी सरळ सभ्य का नाही आवडत? खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, विचार सोडून सत्तेत बसायचे हेच गेली पाच वर्षे सुरू आहे. हे फोडा फोडी असेल धंदे करणारे रा
जकारणी हवेत? आज महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा…. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार, ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल ?
आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे अशा शब्दात राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर हल्लोबोल केला.