मुंबई : आपल्या अभिनयाने अवघ्या कलारसिकांच्या हृदयावर राज्य करणारा… खळाळून हसवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरेनी आयुष्याच्या रंगमंचावरून अखेर एक्झिट घेतली. गेली काही वर्षे त्यांची कॅन्सरशी झुंज सुरु होती. त्यावर मात करून पुन्हा रंगमंच गाजवण्यासाठीही ते सज्ज झाले होते. नाटकाच्या तालमीही सुर होत्या. पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी आपलव्.३ अभिनयाची छाप सोडली होती.
मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.
अभिनेते जयवंत वाडकर यांनी अतुल परचुरेंच्या जिद्दीला उजाळा दिला. त्यांनी सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय. अशा शब्दात वाडकर यांनी श्रद्धांजली वाहीली.
एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. एका सिनेमात त्याने माझं लहानपण केलं होतं आणि हे मी विसरुच शकत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दिली.
अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर एक दमदार प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाची निवडही केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. आणि आज अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे निखळ हास्य त्याचे चहाते कधीच विसरू शकणार नाही.
