आदित्य ठाकरेंनी दिली माहिती
मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहीती आदित्य ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. दरम्यान, उद्धव ठाकरे सकाळी ८ वाजता नियमित तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. अशी माहीती आदित्य ठाकरे यांनी दिली. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती
