नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर.
राजीव चंदने
मुरबाड : झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचे विज पुरवठा करणारे शेकडो पोल पडले होते.तर ठिकठिकाणी तारा तुटल्या होत्या.त्यामुळे तब्बल चार दिवस तमाम मुरबाड कर अंधारात असताना महावितरणने पन्नास वर्षांपूर्वीचे पोल बदलले मात्र त्याच तारातुन विजपुरवठा सुरू केल्याने या तारा केव्हाही तुटून पडतील व मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल . अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली असुन महावितरण च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरबाड तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे शहरी औद्योगिक व ग्रामीण भागात महावितरण चे शेकडो पोल खाली पडले तर तारा तुटुन विज पुरवठा खंडित झाला .ते पोल उभे करण्यासाठी व त्या जोडण्यासाठी महावितरणने सुमारे आठ एजन्सीच्या नेमणुका केल्या होत्या.या एजन्सी ने औद्योगिक व ग्रामीण भागात पडलेले पोल नव्याने बसविले तर त्याच तुटलेल्या तारा जोडूल्या .मात्र मुरबाड शहरातील बाजार पेठ हि एक किलो मिटर पेक्षा मोठी असुन या मुख्य बाजारपेठत किरकोळ पाऊस किंवा वादळ आले तर सडलेल्या तारा तुटतात.त्यामुळे अनेक नागरिकांना विजेचा धक्का लागुन ते गंभीर जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक पोल पडले व तारा तुटल्या त्यावेळी तरी महावितरण नवे पोल आणि तारा टाकतील आणि नागरिक तुटणाऱ्या तारा पासुन सुरक्षित राहतील असे वाटत होते.मात्र महावितरणने या कामासाठी एका एजन्सीची नेमणुक केली असताना त्यांना मेहनत लागु नये यासाठी जुन्याच सडलेल्या तारांची जोडणी करून मुरबाड बाजारपेठेतील ग्राहक व व्यापारी यांचे जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याने महावितरणच्या कारभारावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट
!! या कार्यालयाकडे नवीन साहित्य उपलब्ध नसल्याने विजपुरवठा तात्काळ सुरू करण्यासाठी जुन्या तारा उपयोगात आणल्या आहेत.केतन थत्ते .उप अभियंता महावितरण मुरबाड.
