महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान ० २३ तारखेला निकाल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर झाली असून विविध पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केलीय. महाराष्ट्रातील निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. विधानसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्यामुळे पक्षांकडे अवघे १४ दिवस शिल्लक राहीले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूका होणार आहेत. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होईल.महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार असून त्यासाठी १ लाख १८६ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओव्दारे रेकॉर्ड होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांची महायुती विरुध्द काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या मविआमध्ये सरळ मुकाबला असेल.
मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएम व्हॅनवर निर्बंध
निवडणूकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे सुरक्षितपणे पाठविण्यासाठी चलाखीने बँकांच्या एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीचा वापर करीत. याची गंभीर दखल घेत निवडणूक काळात रात्री ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. १७ सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक –
निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नव मतदार – 20.93 लाख
पुरूष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
युवा मतदार – 1.85 कोटी
तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
शहरी मतदार केंद्र – 42,604
ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960
