मुंबई : ‘एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम’ अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी महाराष्ट विधानसभेचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर दिली.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदारही महायुतीचा एकाच टप्प्यात पराभव करण्यासाठी तयार झाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी आहे, पण आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू. महाविकास आघाडीमध्ये २१० ते २१८ जागांवर एकमत झालं असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित ६० जागांवरही एकमत होईल.
जयंत पाटील म्हणाले की, “लोकसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक ७ टप्प्यात घेण्यात आली आणि आज अचानकपणे विधानसभा निवडणूक एका टप्प्यात जाहीर करण्यात आली. सरकारला बराच वेळ मिळाला आणि सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या. राज्याची तिजोरी रिकामी केली. तिजोरीत काहीही नसताना शक्य असेल तेवढं वाटप करण्याचा काम केलं. शेवटी आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापुढे सरकार आता नवीन काही योजना जाहीर करणार नाही.”
हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून योजना जाहीर करून मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते एका टप्प्यात पराभूत होतील असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
