मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई एम्प्लॉईज को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.सेंट्रल बँक एम्प्लॉईज असोसिएशन मुंबईचे सरचिटणीस विजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. या सोसायटीवर अध्यक्ष-डेनिस कुटीनो, उपाध्यक्ष- दीपक खामकर, सरचिटणीस- जयराम अय्यर, खजिनदार- झुबीन अर्जानी तर संचालक म्हणून शेखर कामतेकर, बल्लुभाई पटेल, विशाल चव्हाण, रुपेश पतारे, मनीषा दळवी, चंद्रकांत जाधव, राजेश कोकमकर,किरण म्हात्रे, समर्थ तोडणकर, स्वेता कनेरकर तर तज्ज्ञ संचालक म्हणून विजय दळवी, कार्यलक्षी संचालकपदी लऊ साळवी यांची निवड केली आहे. सेंट्रल बँक कर्मचारी पतसंस्थेची ही निवडणूक ६३ वर्षानंतर प्रथमच बिनविरोध झाल्याने कर्मचारी सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
