ठाणे : श्री. ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस, ठाणे या संस्थेच्या प्रमुख अर्चना देशमुख यांनी आयोजित केलेल्या वार्षिक संमेलणाचा कार्यक्रम नुकताच द्वारका बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. दर्शना योगेश जानकर, डॉ. अरुंधती भालेराव, तेजश्री सावंत, चंद्रकांत चौधरी, चेतन कोळी, आनंदी खोत, पत्रकार अनिल ठाणेकर आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते.

श्री ब्रह्म गुलाब क्लासेस यांचा स्नेहसंमेलन तसेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता  हा सांस्कृतिक कार्यक्रम अर्चना देशमुख यांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत स्वतंत्र तबला वादन, ढोलकी वादन तसेच गायन नृत्य यांच्या सादरीकरणाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी मान्यवरांचे योग्य असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले गेल्या पंधरा वर्ष विद्यादानाचे कार्य श्री ब्रह्म गुलाब क्लासेस मार्फत अर्चना देशमुख या करीत आहेत ठाणे, मुलुंड येथे ऑनलाइन वर्ग अर्चना देशमुख या घेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *