महानगरपालिकेचा उपक्रम
नवी मुंबई : शहरातील स्थानिक कॅन्सरपीडित रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात जाऊन कॅन्सर आजारावर औषधोपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांबरोबरच नातेवाइकांनादेखील त्याचा त्रास सोसावा लागत होता. आता कॅन्सरपीडित रुग्णाला नवी मुंबईतच केमोथेरपी करता येणार आहे. तसेच, कॅन्सर आजाराचे निदान चाचणी आपल्याच प्रभागातील पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविण्यात येतात.
पालिकेच्या सर्वच नोडमध्ये प्रशस्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली स असून येथे रुग्णांना उपचार दिले जात आहेत. पालिकेच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी कोपरखैरणे प्र येथील नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण, सहा आधुनिक शस्वक्रियागृह सुविधाचे लोकार्पण, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व स्क्रिनिंग सुविधाचे उद्घाटन करण्यात आले आहे. कॅन्सर आजाराबाबत जागरूकता वाढविणे, रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर निदान चाचणी होईल.
