शहापूर वन विभागाने काय कारवाई केली ? – सागर जोंधळे
ठाणे : पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर संबंधितांवर शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ? असा प्रश्न डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी वनविभाग शहापूर यांनी वअनिल देशमुख यांच्या डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर कारवाई केलेली होती व वन विभागाकडून धाड टाकून पांढरीची लाकडे जप्त करण्यात आली. पुढे आपण संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली ? आणि कारवाई केली असल्यास त्याची पूर्ण माहिती मला मिळावी ? असे प्रश्न स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या या माहिती अधिकारातील प्रश्नाने शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांकडून उत्तरे देताना अनेक गुपीते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यामुळे सागर शिवाजीराव जोधळे यांच्या प्रश्नांना शहापूर विभागीय वन विभाग काय उत्तरे देतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चौकट
पांढरीचे लाकुड खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: कोकण भागातील जंगलामधेच आढळते. पांढरीच्या लाकडाचे मुख्य वैशिष्टे म्हणजे या वनस्पतिचे लाकुड पाण्यात तळाशी बुडते.
