

अनिल ठाणेकर
ठाणे : मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी १५० कोटींचा भरघोस विकास निधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिला असून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे, मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याचे माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे अणि प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच पवार यांनी तातडीने मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी नियोजन विभागामार्फत ४० कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे. अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार ५ कोटीचा निधी दिला आहे. तत्पूर्वी स्थानिक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ५५ कोटीचा विकास निधी दिलेला आहे. अजितदादांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत नियोजन विभागामार्फत २१ जून २०२४ रोजी ५० कोटीचा निधी आला होता तर अल्पसंख्यांक विभागामार्फत ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ५ कोटींचा निधी, आता नियोजन विभागामार्फत १४ ऑक्टोबर रोजी ४० कोटी असा एकूण १५० कोटींचा विकास निधी मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी महायुती सरकारकडून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे अणि प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली.
००००
