कुणबी समाजोन्नती मंडळाकडून मुरबाड तहसीलदार यांना निवेदन
राजीव चंदने

मुरबाड : राज्यातील  महायुतीचे सरकार  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल याचे लाड पुरवत असून त्याने केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करत आहे. हा एक प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय असून शासनाने सगे – सोयरे या काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास ओबीसी समाजाचा राज्यात ठिक ठिकाणी प्रखर विरोध होत आहे,  सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करावे अन्यथा सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल . मराठा समाजाच्या हितासाठी काढलेल्या सगे -सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर नको व‌ मराठ्यांना कुणबी दाखले देणे बंद करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन आज मुरबाड तहसीलदार यांना मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे, सरचिटणीस अरविंद विशे, माजी खजिनदार सदानंद मोरे, समाज सेविका योगिता शिर्के, ओबीसी युवा नेते मिलिंद मडके, पत्रकार दिलीप पवार, माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर वडवले, संजय हंडोरे (पाटील), संतोष राऊत उपस्थित होते, यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी निवेदन स्विकारून समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *