मुंबई :  मुलुंड पूर्व येथील पाम एकर सोसायटीत साई बाबांच्या पूजास्थानवर  रविवारी बाबांचा पुण्यतिथी दिन शेकडो साई  भक्तांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या पुण्यतिथीनिमित्त बाबांसाठी  आराधना विधी करुन भक्तांनी त्यांचे पुण्यस्मरण केले.  या कार्यक्रमाचे आयोजन गव्हाणकर परिवार व स्वर्गीय अण्णासाहेब गव्हाणकर साई सेवा ट्रस्ट तर्फे केले होते.
पुण्यतिथी व साई बाबांच्या कफनीचा दर्शन सोहळ्यानिमित्त दोन दिवस  साई भंडारा झाला.याचा लाभ १५०० साई भक्तांनी घेतला. सकाळी काल्याच्या कार्यक्रमाने या  सोहळ्याची सांगता झाली. साई बाबांचे निस्सीम भक्त डाॅ. प.पू. अण्णासाहेब गव्हाणकर यांना प्रत्यक्षात शिर्डीत  बाबांनी स्वतः परिधान केलेली कफनी भेट दिलेली आहे. या कफनीचा दर्शन सोहळा शनिवारी झाल्यानंतर पूजास्थानवर अंकुश दिक्षित यांच्या सुश्राव्य भजनाचा  कार्यक्रम झाला. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विवेक हाडपी, दत्ताराम ठुले, खामकर या शाहिरांनी बाबांवरील भक्तीगीते सादर केली. विद्या देठे यांनी गण गौळण सादर केली. साई लिला भजन मंडळाने सुश्राव्य भजन यावेळी सादर करुन साई भक्तांना मंत्रमुग्ध केले.  तसेच  संजीव जहागीरदार यांचे सुश्राव्य गायन झाले.  याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त सर्वश्री विनित गव्हाणकर, भूषण गव्हाणकर, पुुष्कर नाईक,विलास सुभेदार,सुरेन्द्र वैवुडे, अरुण साळवी,विजय लाड या  ट्रस्टींसह साई भक्त नाट्य निर्माते लेखक दिग्दर्शक नाटककार संतोष पवार, दिलीप बेलोसे,ज्ञानेश्वर कडू,प्रविण सावंत आदी उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *