संजय गुप्ता यांना वंचित विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत उल्हासनगर विधानसभेतून संजय गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकिय पक्षाने जाहीर केलेले हे पहिले तिकीट आहे. वंचित विकास आघाडीने आता पर्यंत 51 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. बुधवारी जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत उल्हासनगर विधानसभेसाठी संजय गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संजय गुप्ता यांनी पंधरा दिवसापूर्वी भाजप उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष पद सोडत वंचित विकास आघाडी मध्ये प्रवेश केला होता.
भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या बरोबर वाद झाल्याने त्यांनी प्रथम भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती. मात्र उल्हासनगर भाजप ही सिंधी समाजाच्या दावणीला बांधली असून उत्तर भारतीयांची त्यांना फक्त मते हवी आहेत. हे लक्षात आल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.