मनसेचे मिशन ठाणे जाहिर

ठाणे : लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊन महायुतीसाठी मत मागणारे राज ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंच्याच विरोधात एल्गार पुकारला आहे. मनसेचे मिशन ठाणे आज जाहिर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसे अभिचित पानसे यांना उतरवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील चारही जागा मनसे दिलसे लढवणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

ठाणे शहर मतदार संघात भाजपच्या संजय केळकर, ओवळा माजिवडा मतदार संघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

भाजप महायुतील बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांमध्ये एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गेल्याच महिन्यात मराठवाडा आणि विदर्भ दौराही केला आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात करतानाच राज ठाकरेंनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, एकापाठोपाठ एक असे एकूण 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात मनसेनं आघाडी घेतल्याचं दिसून आलं.

अशा असतील ठाण्यातील संभाव्य लढती

  1. एकनाथशिंदे (शिवसेना) विरोधात अभिजित पानसे (मनसे)
    2. संजय केळकर (भाजपा) विरोधात अविनाश जाधव (मनसे)
    3. प्रताप सरनाईक (शिवसेना)  विरोधात संदीप पाचंगे (मनसे)
    4. जितेंद्र आव्हाड (भाजपा)  विरोधात सुशांत सूर्यराव (मनसे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *