ठाणे, दि.17(जिमाका):- सुरेंद्र अर्जुन जडयार (वय 57 वर्ष), धंदा शिधावाटप अधिकारी, रा.ठी.5/101. आनंदविहार कॉम्लेक्स, खारेगाव फाटक शेजारी, कळवा. जि. ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाणे येथे – 483/2022, भादवि कलम 420.34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3,7,8,9,10, सह मोटर स्पीरीट अॅन्ड हायस्पीड डिझेल (रेग्यूलेशन आफ सप्लाय, डिस्ट्रीब्युशन अॅन्ड प्रिवेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस) ऑर्डर 2005 चे कलम 2,3, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये टँकर एम.एच.46-बीएफ-7565 तसेच त्यामध्ये असलेला 19440 कि. म्हणजेच 23564 लिटर इतका पेट्रोलियम द्रव पदार्थ सिलबंद जमा करण्यात आला होता.
तरी हा टँकर एम.एच.46-बीएफ 7565 याचा नियंत्रक शिधावाटप व संचालक ना.पु. मुंबई यांचे आदेशपत्र क्र.निशि/अंमल/6/प्र.क्र.31/2022/जा.73, दि.23 मार्च 2023 अन्वये या वाहनाचे लिलाव करण्याचे आदेश झाल्याने या लिलावाची बातमी प्रसिध्द झाल्यापासून 8 दिवसात जाहिर लिलाव करण्यात येणार आहे, असे कळवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव यांनी कळविले आहे.