अनिल ठाणेकर
लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जीवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच विकासाबद्दल प्रश्न विचारल्यावर विचलित होत असतात. महायुती सरकारकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातील विकासासाठी आतापर्यंत १५० कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. यातील काही कामे सुरु झाली आहेत, काही टेंडर निघून कामे मार्गी लागतील. न्यायदेवतेच्या हाती आता संविधान आहे, डोळ्यावरच्या पट्टीऐवजी डोळे उघडे आहेत, हा देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावर चालेल हा संदेश देणाऱ्या बदलाचे स्वागत सर्व भारतीयांनी केले पाहिजे. विसंगतीसह मुख्यमंत्रीपदावरुन एक शर्यतही काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या तीनही पक्षामध्ये दिसून येते. विकासाचे पर्व घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांपर्यंत जाणार आहोत. महायुतीचा उमेदवार कमळ घेऊन उभा असेल तिथे कमळाचा प्रचार करु, जिथे धनुष्यबाण घेऊन उभा असेल तिथे धनुष्यबाणचा प्रचार करु, जिथे घड्याळ घेऊन उभा असेल तिथे घड्याळाचा प्रचार करु, असे मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.*
मला माहीत नाही विकासाबाबतचे प्रश्न विचारणारे बॅनर कळवा मुंब्र्यात लावण्यात आले.’हक्क मागतो महाराष्ट्र’ अशाचप्रकारे कळवा मुंब्रा मतदारसंघातील १५ वर्षाच्या विकासाबद्दल मतदाराने बॅनरद्वारे प्रश्न विचारला असेल की ‘हिशोब मागतोय मुंब्रा कळवा, १५ वर्ष विकासाचा’, मला त्याची कल्पना नाही. पण मी त्या मतदाराच्या भावनेशी सहमत आहे आणि ज्यांनी विकास केला नसेल कदाचित त्या लोकांनी ते बॅनर फाडले असतील. खरतर लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जीवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच विकासाबद्दल प्रश्न विचारल्यावर विचलित होत असतात याचे हे एक उदाहरण आहे. नकलाकार, कलाकार डॉ. जितेंद्र आव्हाड नेहमी टाहो फोडत असतात की महायुती सरकार मुंब्रा कळव्याला विकास निधी देत नाही मुळात महायुती सरकारकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातील विकासासाठी आतापर्यंत १५० कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५५ कोटी, नियोजन विभागाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पहिले ५० कोटी नंतर ४० कोटी, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तारसाहेब यांच्यामार्फत ५ कोटी असा १५० कोटीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे. यातील काही कामे सुरु झाली आहेत, काही टेंडर निघून कामे मार्गी लागतील. ब्रिटिशकालीन न्यायदेवतेची प्रतिमा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर बदललेली आहे, ही बाब सकारात्मकदृष्टीने सर्वांनी पहायला हवी. न्यायदेवतेच्या हाती आता संविधान आहे, डोळ्यावरच्या पट्टीऐवजी डोळे उघडे आहेत, हा देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावर चालेल हा संदेश देणाऱ्या बदलाचे स्वागत सर्व भारतीयांनी केले पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडी म्हणतेय, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा करु तर दुसरीकडे शरद पवार हे जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सूचित करत आहेत, एका बाजुला उद्धव ठाकरे यांनी सातत्याने ही भूमिका मांडायची की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जनतेसमोर गेला पाहिजे तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सांगतात की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर ठरवू अशाप्रकारे महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या तीनही पक्षांमध्ये विसंगत भूमिका दिसत आहे. लोकसभेतील निवडणूक निकालानंतर जिंकलेल्या जास्त जागांमुळे काँग्रेस पक्ष आणि स्ट्राईकरेट अधिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे शिवसेना उबाठा पेक्षा मोठा भाऊ आहोत अशी अनेक नेत्यांच्या वक्तव्यामधून भूमिका येत असते. या विसंगतीसह मुख्यमंत्रीपदावरुन एक शर्यतही तीनही पक्षामध्ये दिसून येते. शब्दांचा प्रयोग करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्माचा, जातीच्या भावना दुखावल्या जातील अशाप्रकारचे शब्दप्रयोग करु नयेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कायम विकासाचा दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या निवडणूकीमध्ये विकास कामांच्या जोरावरच आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच धोरण आहे. आणि हेच विकासाचे पर्व घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांपर्यंत जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा समन्वयक म्हणून ठाणे व पालघर जिल्ह्यातील ज्या ज्या जागा मागायच्या आहेत त्या जागांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे दिलेला आहे.त्याच्यावर राज्यपातळीवर योग्य ती चर्चा व निर्णय होईल, ज्या जागा आम्हाला लढायला मिळतील त्या जागा महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस लढेल. ज्या जागांवर महायुतीचा उमेदवार कमळ घेऊन उभा असेल तिथे कमळाचा प्रचार करु, जिथे
…
