ठाणे : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक श्रीमती जागृती दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य शाखेच्या अव्वल कारकून श्रीमती वैशाली तळपे, श्रीमती समृद्धी भोईर व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
