भाजप नव्या चेहऱ्यांना देणार संधी

 मुंबई भाजापाचे टीव्ही डिबेटवरील आक्रमक चेहऱा असणाऱ्या राम कदमांसह, भारती लव्हेकर, कॅप्टन तमिल सेल्वन, पराग शहा, आणि सुनली राणे यांचे तिकीट धोक्यात असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सर्वात मोठा धक्का हा भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. राम कदम हा भाजपचा प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकणारा चेहरा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते.

राम कदम हे २००९ साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये  राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ आणि २०१९ मध्ये राम कदम सहजपणे निवडून आले होते. दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आणि धार्मिक स्थळांच्या यात्रांमुळे राम कदम हे सातत्याने चर्चेत असतात. राम कदम यांच्याएवेजी भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *