ठाणे : महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, यांच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. 2, ठाणे हे कार्यालय 2 रा मजला, बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव जवळ, कल्याण (पश्चिम), जि.ठाणे 421301 या नवीन जागेत 6 मे 2024 पासून कार्यान्वित झाले आहे.
तरी या कार्यालयाच्या नवीन जागेच्या पत्त्याबाबतची नोंद सर्व नागरिक, विद्युत ठेकेदार, सर्व विद्युत ग्राहक व सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये यांनी घ्यावी, असे आवाहन ठाणे निरीक्षण विभाग क्र.2 चे विद्युत निरीक्षक राजेश यादव यांनी केले आहे.
