अशोक गायकवाड
रायअशोक गायकवाडगड :उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पनवेल तालुक्यातील मौजे वळवली, येथील स. नं.४९/०, या जमिन मिळकतींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणेच्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणदार यांची कागदपत्रे व पुरावे तसेच या संदर्भात त्यांचे म्हणणे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव यांनी दिले आहेत. या अनुषंगाने सर्व अतिक्रमण धारक यांनी स्वतः अथवा वकिलामार्फत कागदपत्रे व पुरावे दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपर तहसीलदार कार्यालय, पनवेल येथे सादर करण्याची जाहीर सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. तरी संबंधित यांनी आपले संबंधित कागदपत्रे/ पुरावे स्वतः अगर वकिलांमार्फत विहित वेळेत सादर करावेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी कळविले आहे.
मौजे वळवली, ता. पनवेल, जि. रायगड येथील स. नं. ४९/० ही जमिन सिडकोच्या नांवे दाखल आहे. सदरच्या जमिनीबाबत याचिकाकर्ते नामा कान्हा चौधरी व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. सदरच्या दाव्यातील ७ ऑक्टोबर च्या आदेशाच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मौजे वळवली, ता. पनवेल, जि. रायगड येथील स. नं. ४९/० या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणदार यांनी त्यांचे वास्तव्याबाबत म्हणणे मांडणे, तसेच संबंधित कागदपत्रे/ पुरावे सादर करण्याच्या सुचना मुख्य सचिव यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक नोटीस, जाहिरनामा १५ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
0000