अशोक गायकवाड

अलिबाग : स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीतील जुन्या वृत्तपत्रांची रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे.

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *