प्रकाश आंबडेकरांचा खळबळजनक आरोप

शैलेश तवटे

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमची शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दुबईत भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर या भेटीत दाऊदने शरद पवारांना सोन्याचा हार घातला होता असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

शरद पवार १९८८-९१ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कॅलिफोर्नियाला व्हाया दुबईजात दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचा लंडन आणि कॅलिफोर्नियाचा दौरा ठरला होता. लंडनहून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली, त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले आणि दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्यास तत्कालीन केंद्र सरकारची परवानगी होती का ? परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्या वेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असा सवाल ही  ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *