मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवडी, पुणे येथे आयोजित केली आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ठीक १२:०० वाजता होणार असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी कळविले आहे. या सभेत खो-खोचा प्रचार-प्रसार व पुढील वाटचाल या बद्दल सुध्दा चर्चा होणार असल्याचे जाधव यांनी संगितले.
0000
