सोयगाव;-शहरात सोशल मीडियावर एकाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बद्दल अपशब्द वापरून कमेंट केल्याने शहरातील मराठा सेवकांचा तीनशे ये चारशे जणांचा जमाव सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यासमोर येऊन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ठिय्या केला होता त्यामुळे शहरात गोंधळ उडाला होता
शहरात सोशल मीडियाच्या एका समूहावर एका ने वादग्रस्त पोस्ट करून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरून पोस्ट केली त्यामुळे शहरातील मराठा तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्याने सायंकाळी सात वाजता शहरातील मराठा तरुण आक्रमक झाले व सोयगाव पोलीस ठाण्याचे समोर घोषणा बाजी करून दोन ते अडीच तास ठिय्या केला व जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यात त्या तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत समजुत काढल्या मुळे रात्री साडे नऊ वाजता मराठा तरुणांनी ठिय्या माघारी घेतला होता..यावेळी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल,उपनिरीक्षक रजाक शेख, जमादार राजु बर्डे,अजय कोळी,रविंद्र तायडे,गजानन दांडगे,दिलीप पवार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.