राजीव चंदने
मुरबाड : ऍड. वैशाली घरत मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बळीराजा सेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
मुरबाड विधानसभा निवडणुकीत सध्या कोण उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणुका लढवणार हे चित्र स्पष्ट नसले तरी काही पक्षानी उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यात अपक्ष उमेदवारही मागे राहिलेले नाहीत.
ऍड. वैशाली घरत गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे,  त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
ऍड. घरत ह्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय आणि अग्रेसर आहेत.याचा फायदा हा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो असा अंदाज आहे.

कोट
पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करेन. आतापर्यन्तच्या राजकीय इतिहासात मुरबाडमध्ये विधानसभा निवडणुकीत महिलांना कुणीही न्याय दिला नाही. माझ्या पक्षाने मला उमेदवारी देऊन समस्त नारीशक्तीचा सन्मान केला आहे. शेतकरी, महिला, विदयार्थी यांच्या न्याय हक्कासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला आहे.
ऍड. वैशाली घरत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *