माथेरान : दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण प्रकल्प( एस्टीपी ) कामे पूर्ण करण्यासाठी कामाने वेग घेतला असून ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठेत रस्त्यांची खोदाई पूर्ण करण्यात आली आहे. त्या भागातील रस्ते बुजवून पूर्ववत करण्यात येत आहेत.
चार महिने पावसाळ्यात ही कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या नंतर या कामाना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.खोदाई केल्यानंतर सर्व मातीचा उपयोग होण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठविण्यात येत आहे. लवकरच या रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येणार असून हे रस्ते पूर्ववत केले जाणार असल्याचे संबंधीत ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात गावांमध्ये स्वच्छता दिसून येणार असल्याने अनेक ठिकाणी शौचालयाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची दुर्गंधी यायची.काही हॉटेल धारकांनी स्वतःच्या हॉटेलमध्ये एस्टीपी प्लांट केला नसल्याने त्या हॉटेलचे सांडपाणी मुख्य रस्त्यावरील चेंबर मध्ये कचरा गोळा झाल्यास सर्व घाण परिसरात पसरल्याने दुर्गंधीचे प्रमाण दिसून यायचे. एस्टीपी प्लांट मुळे गावात दुर्गंधी हद्दपार होणार असून स्वच्छता राखण्यास मदत होईल असे सुज्ञ,अभ्यासू  नागरिक बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *