शेतकरीसह पाच मजुर कीरकोळ जखमी… वरठाण शिवारातील घटना
सोयगाव;-. कापुस वेचणी करुन एका निबांच्या झाडाखाली कापसाची मोजणी करीत असतांना अचानकपणे झाड कोसळुन त्या खाली शेतमालक व पाच मजुर दबल्याची घटना वरठाण शिवारात शुक्रवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नसुन पाचही जणांना मार लागलेला आहे.
वरठाण येथील अशोक धनसिंग सोळंके गट.न १०७ मध्ये शुक्रवारी महीला व पुरुष जवळपास वीस मजुर कीलो प्रमाणे कापूस वेचणी चे काम करीत होते दीवसभर कापुस वेचणी करुन झाल्यावर सायंकाळी पाच सुमारास अचानक वादळीवारा सुटला यावेळी कापुस पावसात ओला होऊ नये यासाठी सर्व गोण्यातील कापूस निबांच्या झाडाखाली आणुन मोजणीचे काम करीत असताना आलेल्या वादळामुळे अचानकपणे निबांचे झाड कोसळले कसे बसे मजुर त्या ठीकाणाहुन पळाले पण यावेळी शेतकरी अशोक सोळंके,मजुर, दीलीप खंडाळे,अजय सुर्यवंशी, शाहरुख तडवी,अनिसा शेख,जया सोनवणे असे झाडाच्या फाद्यांत दबले क्षणाचा विलंभ न करता काही मजुरांनी त्यांना बाहेर काढले जर वेळीच मजुर झाडाखालुन पळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती म्हणून देव तारी त्याला कोण मारी असे उद्गागार यावेळी मजुरांचे निघत होते दरम्यान ह्या घटनेत शेतकरीसह पाचही मजुरांना मार लागलेला आहे.
