भाईंदर : जनहित की आवाज या माध्यमाद्वारे मिरा भायंदर महापालिकेतील महासभेत आलेल्या विषयांवर नगरसेविका नीला सोन्स आवाज उठवत आहेत. हा विषय लोकांच्या जिव्हाळ्याचा असून, यात न्याय मिळावा असं त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एका मैदानात तयार झालेला अनधिकृत बार आणि मिरा भायंदर शहरात असलेली सात भाजी मार्केट्स यामधील भ्रष्टाचार त्यांनी पुराव्यासकट पत्रकारांसमोर मांडला.
येणाऱ्या निवडणुकीपूर्वी हे आत्ता का मांडताय, याविषयी त्या म्हणाल्या की लोकांना खरी परीस्थिती कळावी आणि त्यांनी विचारपूर्वक मतदान कराव.
नीला सोन्स यांनी इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं का काढली नाहीत फक्त एकाच नेत्याविरुद्ध का बोलल्या याबद्दल लोकांनी संशय व्यक्त केला. यानिमित्ताने मिरा भाईन्दरमधील निवडणुकीचे वातावरण तापायल सुरुवात झाली आहे.
