१४७ कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघाच्या
ठाणे : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर केलेली आहे. १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी मतदारांच्या तक्रारी नोंदविणे, त्यांना माहिती देणे या कामे करण्याकरिता १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती मतदान केंद्रात नियंत्रण कक्ष (२४४७) उभारण्यात आले असून या नियंत्रण कक्षात लँडलाईन दूरध्वनी क्रमांक ०२२- २०८१२८३६ व १८००२२००२१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, असे १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंढे यांनी कळविले आहे.
