स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी 134 भिवंडी (ग्रामीण), 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 144 कल्याण (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्ष तसेच नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, 134 भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने, 136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, 137 भिवंडी (पूर्व) विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप, 144 कल्याण (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, 134 भिवंडी (ग्रामीण) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे, 136 भिवंडी (पश्चिम) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत खोले, बाळाराम जाधव, सुदाम इंगळे, 137 भिवंडी (पूर्व) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय घोळवे, 144 कल्याण (ग्रामीण) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश जंगले व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
