मुंबई : प्रवाशांना प्रदुषण विरहीत गारेगार प्रवासाची संधी एसटी आणि बेस्टच्या इलेक्ट्रिक बस देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पुरवठ्यात वाढही झाल्याचे नुकतेच महामंडळाने सांगीतले. एसटी आणि बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवण्यता आघाडीवर असणारी इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने दुसऱ्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचा एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केला. संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या उल्लेखनीय बाबींना अधिकृतपणे मान्यता दिली. या तिमाहीत, ऑलेक्ट्रा ने 315 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 23-24 या आर्थिक वर्षातील 154 च्या तुलनेत यात 105 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीकडे एकूण 10,503 बस ऑर्डर्स आता पर्यत नोंदवण्यात आल्या आहेत.
0000
