अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सर्व आमदार तिकीट आणि आपल्या उमेदवारीसाठी धावपळ करत आहेत. परंतु यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. जनसेवेचे हे अखंड व्रत यापुढे अविरत सुरू राहो तसेच सर्व आव्हान पेलण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवनी आई चरणी केली. यावेळी त्यांची पत्नी परिषा सरनाईक आणि मुलगा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक तसेच सुना, नातवंड असा संपूर्ण सरनाईक परिवार सोबत होता.
़०००००
