वीज कोसळून दोन ठार, आठ शेळ्या ही ठार

सोयगाव- बनोटी परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटात बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा येथे दोन मुले ठार झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे तर आठ शेळ्या ठार झाल्या आहे

बनोटी परिसरात सोमवारी तासभर विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस झाला यामध्ये तिडका शिवारात गट क्र-१२२ मध्ये कापूस वेचणी करत असताना अंगावर वीज कोसळून अजय नथ्थु राठोड(वय १८ रा बोरमाळ तांडा) हा जागीच ठार झाला असून या शेतात त्याच्या मालकीची आठ शेळ्या बांधावर चरत असतांना ठार झाल्या आहे अन्य दुसऱ्या घटनेत हनुमंत खेडा शिवारात आई व मुलगी गट क्र-१६४ मध्ये कापूस वेचणी करत असताना वीज अंगावर कोसळून मुलगी अश्विनी मच्छिंद्र राठोड(वय १५ रा हनुमंत खेडा ही जागीच ठार झाली तर आई अनिता मच्छिंद्र राठोड (वय ४०) ही अंगावर वीज कोसळून गंभीर भाजली आहे दरम्यान या घटनेत मुलगी अश्विनी राठोड हिचा जागीच वीज कोसळून मृत्यू झाला आहे या दोन्ही घटनांचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे पशुसंवर्धन विभागाने मृत आठ शेळ्या वर शवविच्छेदन केले आहे तर वीज कोसळून मयत झालेल्या अजय राठोड व अश्विनी राठोड यांच्यावर बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सपुरा कादरी यांनी शवविच्छेदन केले आहे…दरम्यान नांदगाव तांडा ते हनुमंत खेडा या बनोटी मंडळातील ४२ गावात सोमवारी झालेल्या विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला यामुळे होते नव्हते ते हातातून गेले आहे त्यामुळे ऐन दिवाळी सण अंधारात साजरी करण्याची वेळ सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे मक्याची पिकांना पुन्हा कोंब फुटले आहे कपाशी च्या बॉंडे वाळली आहे एकीकडे शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे मात्र पीकविमा कंपनीने नुकसानी च्या तक्रारींचे पोर्टल बंद केले आहे त्यामुळे शेतकरी हताश झाले आहे…

—–पोर्टललाही आचारसंहिता लागू झाली काय संतप्त संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे….

वीज कोसळून ठार झालेल्या अजय राठोड च्या पश्चात आजी आई वडील एक भाऊ आणि हनुमंत खेडा येथील मयत अश्विनी च्या पश्चात आई,वडील,एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *