मुंबई : लोअर परळ स्थानकात अज्ञात इसमाने मोहिणी कांबळे यांचा मोबाईल हिसकाविण्याच्या प्रयत्न केला. या घटनेत मोहिनी या चालत्या रेल्वेतून खाली पडल्या. त्यांना किरकोळ मुका मार लागला असून मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात  वेगवेगळ्या कलमांतर्गत गून्हा नोंदविण्यात आला आहे.
ग्रँट रोडला कामाला जात असताना घाटकोपर स्थानकावरून जलद रेल्वे पकडली. कामाला उशीर होत आहे; म्हणून संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या दादर येथून ७:४५ ची लोकल पकडली. घाई गडबडीत ते दीव्यांगाच्या आरक्षित डब्यात चढल्या. रेल्वेच्या दाराजवळ ते मांडी घालून बसल्या. लोअर परळ स्थानकात रेल्वे थांबली असता काही क्षणात एक इसम रेल्वेत चडला. रेल्वे चालू झाली असता, अचानक त्या इसमाने मोहीणी यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतू, मोबाईल जाम पकडला असला कारणाने त्या चालत्या रेल्वेमधून खाली स्थानकावर पडल्या. नशीबाने त्या रेल्वेखाली येता – येता अगदी थोडक्यात बचावल्या. यादरम्यान त्यांची बॅग रेल्वेमध्ये राहिली. त्या बॅगेत त्यांचा पगार व सोन्याची चैन आणि कानातील टॉप्स असा एकूण लाख भर रुपयाचे सामान होते.
या घटनेमुळे मोहीणी फार भयभीत झाल्या; त्यांच्या शरीराचा थरकाप उडत होता. त्यांना किरकोळ मुका मार लागला आहे. त्यांनी ताबडतोब स्टेशन मास्टर स्नेहल जाधव, यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. या घटनेविरोधात मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इस्माविरोधात रात्री गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.हेमराज कुंभार यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तपासाची सूत्र फिरवली असता अवघ्या बारा तासाच्या आत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरी झालेली बॅग हस्तगत करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री.एन.आर.इंद्रोले करत आहेत.
मी पोटाला चिमटा काढून एक – एक पैसा जमा करुन मी माझ्या मुलांकरिता दागिना बनवला होता. पोलिसांनी त्या चोरट्याला पकडले. माझा जीव भांड्यात पडला. अशा पोलिसांमुळे नागरीक सुरक्षित आहे. मी मनापासून आभार व्यक्त करते. 0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *