मुंबई : मुलुंडचे आमदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे उद्या, गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी मुलुंड विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जंगी ‘रोड शो ‘ करणार आहेत. रोड शो मध्ये मुलुंडवासियांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन आमदार मिहीर कोटेचा यांनी केले आहे. मुलुंड पूर्व, हनुमान नगर येथील हनुमान चौकातून गुरुवारी, सकाळी दहा वाजता कोटेचा यांच्या रोड शोचा प्रारंभ होणार आहे. ‘विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा मुलुंडच्या सूपुत्राला आशीर्वाद देण्यासाठी या रोडशो मध्ये सामील व्हावे’, असे आवाहन कोटेचा यांनी मुलुंडमधील मतदारांना केले आहे.
मिहीर कोटेचा हे मुलुंडचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना भाजपने येथून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीमध्ये कोटेचा यांच्या नावाचा समावेश आहे. कोटेचा हे भाजप महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना तब्बल ८७,२५३ मते पडली होती तर ‘मनसे’च्या उमेदवार हर्षला चव्हाण यांनी दुसऱ्या क्रमांकाची २९,९०५ मते घेतली होती. कोटेचा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
गेली ३४ वर्ष कोटेचा हे भाजपमध्ये सक्रिय पदाधिकारी असून मुलुंडमध्ये मराठी दांडिया आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिलेला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *