ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली. लोकराज्य  पार्टीचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
नरेंद्र पाटील – 172 अणुशक्ती नगर, मुंबई; निल शिवडीकर – 183 शिवडी, मुंबई; कमलेश पोखरे – 173 चेंबूर, मुंबई; संजीवनी वैती. – 155 मुलुंड, मुंबई; बाबुकुमार कांबळे – 147 कोपरी पंचपाखाडी; सुनील विश्वकर्मा – 146 ओवळा माजिवडा; जालिंदर सिनलकर – 148 ठाणे शहर, धीरज मोरे – 118 सटाणा; हेमंत कोळी – 190 उरण; अॅड.  विलास निकुम – 2 शहादा, नंदुरबार (ST); सुभाष बाविस्कर – 105 कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद); रवींद्र जाधव – 111 गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद); भूपेंद्र गवते – 150 ऐरोली, नवी मुंबई; सौ. ज्योती गायकवाड-पवार – 174 कुर्ला, मुंबई (SC); सौ. संगीत जामनेकर – 37 बडनेरा, अमरावती आणि विशाल बगाळे – 39 तिवसा, अमरावती अशी त्यांची नावे आहेत.
राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य  पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघांतून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे प्राबल्य  असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटितपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *