सुवर्णमहोत्सवी ज्युनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर

 

मुंबई, : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने धाराशिव (उस्मानाबाद) येथे सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली आहे.

या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबई खो-खो संघटनेच्या श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, निलेश सावंत व गुरुदत्त शिंदे यांच्या निवड समितीने संघ निवडीचे काम पहिले व त्यांनी मुंबईचा कुमार व मुलींचा संघ निवडला. मुंबईत सातत्याने होणारा पाऊस लक्षात घेऊन या खेळाडूंसाठी तीन महिन्यांचा कॅम्प घेतला होता. त्यात ४६ मुले व ४० मुली सहभागी झाले होते व त्यातून हा अंतिम संघ निवडला आहे. मुंबईच्या कुमार संघाच्या कर्णधारपदी राजेश मंडलची तर मुलींच्या कर्णधारपदी रश्मी दळवीची निवड झाली असून हे दोन्ही खेळाडू ओम साईश्वर सेवा मंडळाचे आहेत.

या दोन्ही संघांचा निरोप समारंभ ओम साईश्वर सेवा मंडळ, लालबाग येथे पार पडला. या समारंभात मुलांना कीट वाटप करण्यात आले. हे कीट लायन्स क्लब ऑफ दादर ज्वेल्स तर्फे मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष लायन अॅड. अरुण देशमुख यांच्याकडून देण्यात आले. त्यावेळी उपाध्यक्ष बाळ तोरसकर, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, सचिव सुरेंद्र विश्वकर्मा, सहसचिव श्रीकांत गायकवाड, चंद्रकांत तरळ, खजिनदार डलेश देसाई, निलेश सावंत, गुरुदत्त शिंदे, तुषार चिखले, आदी मुंबई खो-खो संघटनेतर्फे उपस्थित होते. तर ओम साईश्वर सेवा मंडळाचे खजिनदार सुरेश खंडागळे, उप खजिनदार नंदिनी धुमाळ, राजेश मोरे, सौ. अमिता गायकवाड, कविता परब, वर्षा मोरे, विना कदम, भूपेश गायकवाड

कुमार संघ : राजेश मंडल (कर्णधार), सुजल शिंत्रे, ओम वाटाणे, साई टेंबुलकर (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), सुबोध पाटील (विद्यार्थी क्रीडा केंद्र), रोहन खांबे (सरस्वती स्पोर्ट्स क्लब), देवर्श पांगले, अनिश शिरोडकर (सर्व श्री समर्थ व्या. मंदिर), विघ्नेश कोरे (अमरहिंद मंडळ), श्रेयस सौंदळकर, साई गुरव (सर्व ओम समर्थ भारत व्या. मंदिर), प्रणव कुंभार, निमेश चौगुले, राहुल नेवरेकर, वेदांत नागवेकर (सर्व वैभव स्पो. क्लब), प्रशिक्षक : निलेश सावंत, संघ व्यवस्थापक : गुरुदत्त शिंदे

मुली संघ : हर्षला सकपाळ, जान्हवी लोंढे, रिया सिंग (सर्व सरस्वती स्पोर्टस् क्लब), रश्मी दळवी (कर्णधार), कादंबरी टेरवणकर, काजल मोरे, निर्मिती परब (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), मुस्कान शेख, शर्वी नाडे, आरुषी गुप्ता (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), सलोनी सावंत, अवंतिका अंबोळकर (सर्व वैभव स्पोर्टस् क्लब), रुद्रा नाटेकर (अमर हिंद मंडळ), सृष्टी पाष्टे (ओम समर्थ भारत व्या. मंदिर), तन्वी मोरे (श्री समर्थ व्या. मंदिर), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड, संघ व्यवस्थापिका : वर्षा मोरे

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *