महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नमुंमपा मुख्यालयात लावण्यात आलेल्या ’20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूकीत मी मतदानाचा हक्क बजावणार आहे’ या स्वाक्षरी फलकावर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वाक्षरी केली आणि प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार कर्तव्यभावनेने बजावावा असे आवाहन केले.
