ठाणे : विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.सिंधू हे विश्रामगृह पडघा, बोरिवली तर्फे, राहुर व शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080820 हा आहे तर ईमेल आयडी exp.observerbhiwandi@gmail.com हा आहे.

 

विधानसभा मतदारसंघ 139- मुरबाड, 140 – अंबरनाथ, 141 – उल्हासनगर, 142 – कल्याण पूर्व, 143-डोंबिवली या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.आशिषकुमार पांडे हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.आशिषकुमार पांडे हे रेयॉन सेंच्युरी, शहाड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080844 तर ई-मेल आयडी expenobs139to143@gmail.com हा आहे.

विधानसभा मतदारसंघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजिवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.सुरेंद्र पाल सिंग हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080892 तर ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे.

विधानसभा मतदारसंघ 148 ठाणे, 149 मुंब्रा कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.जी.मनिगंडासामी (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. श्री.जी.मनिगंडासामी हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039060688 तर ईमेल आयडी exp.observer.thane@gmail.com हा आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *