स्वाती घोसाळकर
मुंबई : शिवडी मतदार संघात तिकीट वाटप करताना उद्धव ठाकरेंसमोर मोठाच पेच होता. एकीकडे निष्ठा होती तर दुसरीकडे श्रद्धा. एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतरही शिवडीचे आमदार अजय चौधरीयींन मातोश्रीवरील निष्ठा दाखवित उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंद केले होते. तर दुसरीकडे लालबागच्य राजासोबतच तब्बल दोन पीढ्या मातोश्री निष्ठा बाळगून असलेले सुधीर साळवी होते. यंदा श्रध्दा दाखविणाऱ्या साळवींना वगळून निष्ठा दाखविणाऱ्या अजय चौधरींनी मातोश्रीने तिकीट दिले. आणि लालबागचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
अखेर उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना मातोश्रीवर भेटायला बोलावले. यावेळी संजय राऊतही सोबत होते. उद्धव ठाकरे आणि सुधीर साळवींमध्ये दहा मिनीटं चर्चा झाली. ठाकरेंनी सुधीर साळवींनी सबुरीचा सल्ला दिला आणि त्यांनी तो मानत शिवडीत भगवा फडकवण्याचे वचन ठाकरेंना दिले. लालबागमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. “मी कालही पक्षासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही पक्षासोबत राहणार”, असं सुधीर साळवी म्हणाले.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, सुधीर साळवी आमच्या घरातला मुलगा आहे. राग रुसवे होऊ शकतात. तो नाराज नाही आणि नाराज नव्हताच. सुधीर सकाळीच क्लिअर झाला होता तो व्यवस्थित काम करून ही शीट जिंकून आणेल. सुधीर साहेबांच्या जवळचा मुलगा आहे. काही प्रॉब्लेम नाही.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, सुधीर साळवी हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी उद्धव साहेबांना येऊन शब्द दिलेला आहे. मी शिवसैनिक आहे शिवसैनिकांची कर्तव्य शंभर टक्के पूर्ण करणार आणि मशालचा आमदार मातोश्रीवर घेऊन येणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी दिलेला आहे. सुधीर साळवींसारखा निष्ठावंत शिवसैनिक तेवढ्याच ताकतीने ज्यांना उमेदवारी अजय चौधरींना दिली आहे. त्यांना निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे.
